
# विषय: हृदयरोगमुक्त भारत व माधवबाग!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
माधवबाग आणि खानापूर येथील श्री भाग्यलक्ष्मी मल्टीपर्पज को-आँप.सोसायटी यांच्या संयुक्त विद्यामानेआज शनिवारी दि २६ रोजी दुपारी ४ ते ५.३० यावेळत श्रीभाग्यलक्ष्मी मल्टीपर्पज को.आँप.सोसायटीच्या सभागृहात हृदयमुक्त भारत आणि माधवबाग याविषयावरील आरोग्यविषयक विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सुप्रसिध्द वक्ते म्हणून हृदयरोग तज्ञ व मुख्य विभागीय वैद्यकीय प्रमुख डाँ.सचिन पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती अँड.व्ही.एन .पाटील यानी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,वाढलेला मानसिक तणाव व चुकीची जीवनशैली यामुळे सध्या भारतामध्ये हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब या आजाराचे प्रमाण खुप वाढले आहे.जगातील सर्वात जास्त मधुमेह रूग्ण हे भारतात आहेत.तर लवकरच भारत हृदयरोगाची राजधानी होण्याकडे वाटचाल करत आहे.असे जागतिक आरोग्य संघटनेचे भाकीत आहे.
यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे हे माधवबागच्या व्याख्यानमालेतुन समजावुन घेण्यासाठी सर्वानी आरोग्यविषयक विशेष व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष अँड.व्ही.एन पाटील, समन्वयक शामराव पाटील ,संचालक दिलीप पवार, जनरल मॅनेजर भाऊ चव्हाण आदी उपस्थित होते.