
#१ नोव्हेंबर काळा दिनाविषयी रूपरेषा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
एक नोव्हेबर काळादिनाबाबत रूपरेषा ठरविण्याबाबत तसेच इतर विषयावर चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता शिवस्मारक येथे बोलविण्यात आली आहे.
यासाठी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन खानापूर तालुका म ए समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील व सरचिटणीस आबासाहेब दळवी यानी केले आहे.