
#शांतिनिकेतन स्कूल समोर घडला आपघात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर पारिश्वाड महामार्गावरील शांतिनिकेतन स्कूल समोर सोमवारी दि. ५ रोजी दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक बसुन झालेल्या आपघातात.एकजन जागीच ठार झाला. दुसरा गंभीर जखमी झाला.
यात मृत्यू पावलेल्या दुचाकी स्वाराचे संजय वैजनाथ येल्लूर (वय .१६) असुन मुळचा मुन्नोळी सध्या राहणार देवलती ( ता.खानापूर ) तर गंभीर जखमी झालेला दुसरा दुचाकी स्वार हा नागुर्डा ( ता.खानापूर) येथील विठ्ठल नारायण महाजन ( वय.२९) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,देवलती येथील संजय येल्सूर हा देवलती येथून खानापूराकडे आपल्या मित्राला आणण्यासाठी येत होता. तर नागुर्ड्याचे विठ्ठल महाजन हे खानापूर हुन पारिश्वाडकडे जात असताना शांतिनिकेतन स्कूल समोर दुचाकींची समोरासमोर जोराची धडक बसली. यात संजय येल्लर याला गंभीर झाला .लागलीच त्याला सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु डाॅक्टरनी तपासुन मृत घोषित केले.
संजय येल्लूर याचे वडील लहानपणीच वारल्याने तो आपल्या मामाच्या घरी देवलती येथे राहत होता.तो नंदगड येथील पदवीपूर्व काॅलेजमध्ये घेत होता.त्याच्या पश्चात आई,भाऊ असा परिवार आहे.
सदर घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.