
#तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
डोंगरगाव ( ता.खानापूर )येथे पारायण सोहळ्याचा कार्यक्रम पंढरपूरचे ज्येष्ठ व प्रसिद्ध ह भ प कीर्तनकार नानासाहेब तात्यासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली परायणाला सुरुवात झाली तसेच सर्व कार्यक्रम त्यांच्या अधिष्ठानाखाली झाले तत्पूर्वी महाराजांनी राम कृष्ण हरी हा नामजप कथन करून घेतले व त्याच्यानंतर महाप्रसाद व सकाळी ह भ प विठ्ठल महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले यावेळी खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले की २०१२- १३लां डॉक्टर अंजलीताई यांनी जांबोटी क्रॉस येथे ह भ प विठ्ठल वासकर महाराज यांचे भव्य असे पारायण संपूर्ण खानापूर तालुक्याचे वारकरी महाराज यांच्या समक्ष भरविले होते ते पारायण अविस्मरणीय ठरले याच धरतीवर आज अनेक ठिकाणी ह भ प पारायण होत आहेत प्रत्येक खेडोपाडी कीर्तने होत आहे ते सांप्रदायिक विचार जनतेपर्यंत पोहोचवत आहेत त्याबद्दल तालुक्यातील सर्व वारकरी मंडळींचे अँड.घाडी यानी कौतुक केले. आणि साधुसंतच खरा शांतीचा व भक्तीचा विश्वास निर्माण करू शकतात असे विचारही त्यांनी मांडले यावेळी विठ्ठल महाराज किरहलशी तसेच खानापूर तालुका ग्रामपंचायत युनियनचे अध्यक्ष व सरकार नियुक्त ट्रिब्युलर मेंबर विनायक मुतगेकर व डोंगर गावातील सर्व वारकरी मंडळी तसेच वारकरी भगिनी व गावकरी युवक मंडळे व हेमा डगा पाली देगाव शिरोली तिवोली जामगाव अबनाली निलावडे या परिसरातील वारकरी मंडळी व भजनी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाला संध्याकाळी मोठ्या प्रमाणात डोंगरगाव परायण मंडळाच्या वतीने महाप्रसाद आयोजित केला होता