
# बरगावचे विरूपक्षी पाटील विजयी.तर निळकंठ गुंजीकर यांचा चिट्टी काढून विजय!
#१५ पैकी १३ संचालकाची बीनविरोध निवड!
संदेश क्रांती न्यूज.
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका पी एल डी बॅकेची पंचवार्षिक निवडणुकीत शनिवारी झालेल्या केवळ दोन जागेसाठी निवडणूक पार पडली.
पीएलडी बॅकेवर कर्जदार गटातील केवळ दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात होते. गर्लगुंजी विभागातुन बरगावचे विरूपक्षी महादेव पाटील तर निडगल गावचे तानाजी दत्तू कदम यांच्यात चुरस होती.
कक्केरी विभागातुन प्रकाश सोमणिंग अंग्रोळी व निळकंठ कृष्णाजी गुंजीकर याच्यात चुरस होती.
यावेळी शनिवारी दुपारी ४ वाजता निवडणुकीला प्रारंभ झाला.
या चुरशीच्या निवडणुकीत गर्लगुंजी विभागातील ३४ मतदानापैकी विरूपक्षी पाटील बरगांव याना २२ मते पडली.तानाजी पाटील निडगल याना १२ मते पडली.
तर कक्केरी विभागातील २४ मतदाना पैकी प्रकाश अंग्रोळी याना१२ मते पडली. तर निळकंठ गुंजीकर यांना१२ मते पडली.दोघाना समान मते पडली.
शेवटी चिट्टी काढण्यात आल्या.त्यातुन निळकंठ गुंजीकर यांचा विजय झाला.
विजयी उमेदवारानी गुलाल उधळुन व फटाक्यांची आतषबाजी करून विजय साजरा केला.
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून सरोजा परीट यानी काम पाहिले.
#१३ संचालकांची बीनविरोध निवड!
या पंचवार्षिक निवडणूकीत १५ संचालका पैकी १३ संचालकाची बीनविरोध निवड झाली .
याबीनविरोध निवडणुकीत मुरलीधर पाटील (जळगा),अशोक पाटील (चिक्कदिनकोप),संदीप पाटील (इटगी),नारायण पाटील(बिजगर्णि),
लक्ष्मण कसर्लेकर(आमटे),निंगापा गुरव (हलशी),तर महिला गटातील दोन जागासाठी लक्ष्मी शिवाप्पा पाटील (तिवोली),सुलभा आंबेवाडकर (बेकवाड),आदीची बीनविरोध निवड झाली आहे.
तर सुनिल पाटील (माळ अंकले),अल्प संख्याक गटातुन कुतुबुद्दिन बिच्चन्नावर( माडीगुंजी), अनसुचीत जाती गटातुन यमनाप्पा राठोड (खानापूर),अनुसुचीत जमाती गटातुन श्रीकांत करजगी (गोल्लिहाळ), बीनकर्जदार गटातुन शंकर सडेकर (जांबोटी) यांची बीनविरोध निवड झाली आहे.
या पी एल डी बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन मुरलीधर पाटील यांची चौथ्यांदा संचालक पदी निवड झाली.
#शिवस्मारक चौकात शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला अभिवादन!
पी एल डी बॅकेचे नुतन संचालकानी निवडणुकीचा निकाल लागताच सर्व संचालकांंनी खानापूर शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महारांज्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले.व विजयोत्सव साजरा केला. यावेळी विद्यमान चेअरमन मुरलीधर पाटील सह सर्व संचालक उपस्थित होते.