
सदस्य विनायक मुतगेकर यानी आरएफओना सुनावले.
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
गेल्या कित्येक महिण्यापासुन निलावडे ( ता.खानापूर) ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी,आंबोळी,कांजळे ,निलावडे,दारोळी,गवळीवाडा सह आदी भागात ठाण मांडुन बसला आहे. त्यामुळे हत्ती कडुन भात ,ऊस ,केळी पिका बरोबर झोपड्या,शेतातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून नागरीकाना ही याचा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा वनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा.अशी सुचना निलावडे ग्राम पंचायत कार्यालयात आरएफओ श्रीकांत पाटील यांच्या उपस्थित बैठकीत सुनावले.
यावेळी बोलताना आरएफओ श्रीकांत पाटील म्हणाले की मी नुकताच आरएफओ म्हणून रूजू झालो आहे.मला येथील परिस्थिचा अभ्यास करून हत्तीचा बंदोबस्तासाठी पंधरा दिवसाची मुदत द्यावी.तोपर्यत मी स्वता या निलावडे भागातील हत्तीवर लक्ष ठेवून राहतो.
सध्या मलप्रभानदीला भरपूर पाणी आहे. नदीपलिकडे घालण्यास अनेक अडचणी आहेत.तो पर्यत हत्तीवर लक्ष ठेऊन राहणार आहे.
हत्तीला घालण्यासाठी वनखात्याचे हत्ती आहेत. मात्र सध्या म्हैसुर दसरा उत्सवासाठी वनखात्याचे उपलब्ध नाहीत.तोपर्यंत वनखात्याचे पाळीव हत्ती मिळणार नाहीत .
निलावडे भागातील हत्ती घालवण्यासाठी वनखात्याला याभागातील नागरीकांचे मोठे सहकार्य पाहिजे.
तुमचे सहकार्य घेऊनच याभागातील हत्ती नक्कीच घालवू असे आश्वासन आरएफओ श्रीकांत पाटील यानी दिले.
प्रारंभी पीडीओ श्री मोकाशी यानी प्रास्ताविक केले. तर लक्ष्मण देसाई उपस्थितांचे स्वागत केले.
बीटगार्ड श्री मिलीनमणी,फाॅरेस्टर श्री.निर्वाणी तसेच निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य व निलावडे,कांजळे,कबनाळी,आंबोळी,मुघवडे,बांदेकरवाडा,कोकणवाडा,दारोळी, गवळीवाडा आदी भागातील शेकडो नागरीक उपस्थित होते.