
#बक्षिसे रू.७००१,रू.५००१,रू.४००१,रू.३००१!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
निडगल ( ता.खानापूर ) येथील स्वरर्गीय गुरूवर्य विष्णूपंत दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सिध्देश्वर संगीत भजन मंडळ निडगल यांच्यावतीने आयोजित ” संगीत भजन स्पर्धा रविवारी दि १८ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत.
खानापूर तालुका मर्यादीत संगीत भजन स्पर्धासाठी बक्षिसे पुढील प्रमाणे आहे.
पहिले बक्षिस.रू७००१ , दूसरे बक्षिस रू.५००१, तिसरे बक्षिस रू४००१,रू.चौथे बक्षिस रू३००१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धाचे उदघाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार दिगंबर पाटील ,माजी आमदार अरविंद पाटील,उद्योजक प्रमोद कदम व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी तालुक्यातील संगीत भजन स्पर्धकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकानी केले आहे.संपर्कासाठी मो.नं . ९७४३६४४०१०,९१४८५४६२९५ शी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.