
खानापूर प्रतिनिधी
निडगल ( ता. खानापूर )येथे नुकताच कै. गुरुवर्य विष्णुपंत दत्तात्रय पाटील, ( व्ही.डी.पाटील ) आदर्श शिक्षक, संगीत दिग्दर्शक यांच्या स्मरणार्थ श्री. सिध्देश्वर संगीत भजनी मंडळ, निडगल आयोजीत खानापूर तालुका मर्यादित भव्य संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्पर्धेचे उदघाटन प्रमोद कदम, एम् डी, सिध्देश्वर ग्रॅनाईटस्, निडगल यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशराव चोपडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिगंबरराव पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, गोपाळ पाटील , पांडुरंग सावंत गर्लगुंजी,गणपत पाटील, रावसाहेब पाटील, देवाप्पा कदम, प्रा.भरत तोपिनकट्टी, परशराम कदम आदी उपस्थित होते.
तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई होत्या.
प्रास्ताविक निवृत शिक्षक महादेव पी .कदम यांनी केले.
ह्या स्पर्धेमध्ये खानापूर तालुक्यातील विविध भागातील भजनी मंडळानी भाग घेतला होता. यासाठी रु ७००१ ,रू.५००१ ,रू ४००१ ,रू. अशी एकूण ८ बक्षिसे ठेवण्यात आली होती… प्रत्येक सहभागी संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले
ह्या स्पर्धेतील बक्षिसे, चषक व प्रमाणपत्र हे कै. गुरुवर्य विष्णूपंत दत्तात्रय पाटील यांच्या कुटुंबियांमार्फत ठेवण्यात आली होती…
विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे !
प्रथम क्रमांक श्री. राम कृष्ण हरी संगीत भजनी मंडळ, जांबोटी , दुसरा क्रमांक श्री. हनुमान संगीत भजनी मंडळ, मोदेकोप्प, तिसरा क्रमांक श्री. विठ्ठल रखुमाई संगीत भजनी मंडळ, कुप्पटगिरी, चौथा क्रमांक श्री माऊली महिला संगीत भजनी मंडळ, मोदेकोप्प, पाचवा क्रमांक श्री. महालक्ष्मी बाल संगीत भजनी मंडळ, काटगाळी, सहावा क्रमांक श्री. नागेशदेव संगीत भजनी मंडळ, नागुर्डा, सातवा क्रमांक श्री सिद्धेश्वर संगीत भजनी मंडळ, निडगल, आणि आठवा क्रमांक श्री माऊली वारकरी सांप्रदायिक भजनीं मंडळ, निडगल यांनी पटकावले.
.विजयी स्पर्धाना मान्यवराच्याहस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.