
#राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेता !
# हायस्कूलच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी हायस्कूलचा खेळाडु बॅटमिटनपटू यशवर्धन ज्ञानेश्वर नाडगौडा याने नुकताच झालेल्या कनकापूर बेगळुर येथील राज्यस्तरीय बॅटमिटन स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करत १७ वर्षाखालील वयोगटात बेळगाव येथून दोन तर शिर्शी येथून तीन खेळांडुची असे पाच खेळाडुनी बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले.
यात बेंगळूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेते ठरलेल्या बॅटमिटन पटू यशवर्धन ज्ञानेश्वर नाडगौडा याची राष्ट्रीयस्पर्धेसाठी निवड झाली .
यानिमित्त समर्थ इंग्लीश मिडीय स्कूलच्यावतीने बॅटमिटन पटू यशवर्धन ज्ञानेश्वर नाडगौड याचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्लिश मिडीयमचे सचीव डाॅ डी ई नागौडा होते.
प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.एन एल कदम ,व संचालक मंडळ उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्या सौ दिव्या नाडगौडा यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी पाहुण्याच्याहस्ते बॅटमिटन पट्टू यशवर्धन नाडगौडा याचा शाल ,पुष्पगुच्छ व प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बँटमिटन पटू यशवर्धन याला क्रिडाशिक्षक सुशांत तिरवीर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तर त्याचे आजोबा डाॅ.एन एल कदम यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
बॅटमिटन पटू यशवर्धन याच्या यशाबद्दल खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.