
#इसाखान नसीरखान पठाण,अभिषेक होसमनी.सौ.रूपा नाईक याची निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर नगरपंचायतीवर सरकार नियुक्त नगरसेवकांच्या नेमणुकीचा आदेश कर्नाटक सरकारने नुकताच काढला.
याआदेशानुसार बेळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी व खानापूर तालुक्याच्या माजी आमदार व ए.आय.सी.सी.च्या सचिव डाॅ. अंजली निंबाळकर याशिफारशी नुसार नियुक्त्या करण्यात आल्या असुन यामध्ये खानापूर शहरातील काॅग्रेसचे कार्यकर्ते इसाकखान नसीरखान पठाण, निंगापूर गल्ली ,अभिषेक होसमनी, होसमनी गल्ली, व सौ रूपा नाईक ,नायक गल्ली खानापूर याची नावे आहेत.
खानापूर शहरातील काॅग्रेसपक्षाच्या कार्यकर्त्याची खानापूर शहराच्या नगरपंचायतीवर सरकार नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल खानापूर शहरातील तसेच तालुक्यातील काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यातुन अभिनंदन होत आहे.