
#खानापूर ब्लॉक अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी हाॅस्पिटलात जाऊन केली विचारपूस!
#घाडी फाऊंडेशनच्या वतीने मदत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सोमवारी दि २ डिसेबर रोजी कणकुंबी वनिवभागातूल मान (ता.खानापूर ) येथील शेतकरी सखाराम महादेव गावकर हा दोन अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.
त्याच्या डाव्या पायचा अस्वलानी चिंधडया केल्या त्यामुळे बेळगाव येथील हाॅस्पिटलमध्ये उपचार दरम्यान पाय निकामी करावा लागला.
अस्वलांचा हल्ला!
मान गावचा शेतकरी पत्नी सह शेतात काम करत असताना दोन अस्वलानी हल्ला चढविला.यावेळी प्रसंगावधान राखुन पत्नीला अस्वालाशी झुंज देत पत्नी झाडावर चढविण्यास सांगीतले.नंतर आपण झाडवर चढताना डाव पाय अस्वलाने तोंडाने फोडुन चिंध्या केल्या तशातच हातातील कायत्याने वार करून सुटका करून घेतली.
अस्वले जंगलात पळुन गेल्या नंतर पत्नीने झाडावरून मोबाईल वरून मुलगी बातमी कळविली. व स्वता झाडावरून उतरून पतीला पाठीवर बसुन काही अंतरावर गेल्यावर गावकर्यानी येऊन लागलीच बेळगाव हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.
यावेळी डाॅक्टरनी पाय काढण्याचा सल्ला दिला.सदर शेतकर्याची परिस्थिती फारच हल्याख्याची आहे.
ब्लॉक अध्यक्ष अँड ईश्वर घाडीची हाॅस्पिटलमध्ये विचारपूस!
गरीब शेतकरी अस्वलांच्या हल्यात गंभीर जखमी होऊन पाय निकामी झाल्याची माहिती मिळताच खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी बेळगाव हाॅस्पिटलमध्ये जाऊन शेतकर्याची भेट घेतली.
यावेळी संबधीत वनखात्याकडुन शेतकर्याला काॅग्रेस पक्षाच्यावतीने सरकारकडे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगुन कमीत कमी १५ लाख रूपये नुकसान भरपाई मिळावी.
असे सांगुन स्वत: घाडी फाऊंडेशनच्यावतीने शेतकर्याला आर्थिक मदत करणार असल्याचे सांगीतले. गरीब शेतकर्याची परिस्थिती हल्याख्याची आहे.तेव्हा सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यानी केले.
यावेळी खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी सह अँड.बाळेकुंद्री,खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर व इतर काॅग्रेसचे नेते उपस्थित होते.
शेतकर्याचे नाव सखाराम महादेव गावकर (वय ६२) असुन त्याची पत्नी सुदैवाने अस्वलाच्या हल्ल्यातुन सुटका झाली आहे.