
#मळवात नाट्यप्रयोग संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
निलावडे ( ता.खानापूर )ग्राम पंचायत हद्दीतील मळवसह इतर खेड्यात आमदारानी कोणत्याच समस्या सोडल्या नाही.
निवडणूकीच्या काळात अनेक आश्वासने दिली.त्यामुळे भाजपच्या आमदारानी याभागातून ८० टक्के मतदान करून घेतले. निवडुन आल्यानंतर काहीच समस्याकडे लक्ष दिले.ऐवढेच नव्हे तर याभागातील ऊसाच्या पिकाचे जंगली प्राण्याकडुन प्रचंड नुकसान होत असताना लैला साखर कारखान्याला ऊस नेण्यास दुर्लक्ष केले. जित जंगली प्राणी नाहीत त्याठिकाणाच्या ऊसाची उचल आदी केली.मात्र याभागाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ऊसाचे प्रचंड नुकसान झाले.
याभागात रस्त्याची मोठी समस्या आहे.याकडे दुर्लक्ष होत नाही.अशा अनेक प्रकारच्या समस्या सामाजिक नेते व ग्राम पंचायत सदस्य विनायक मुतगेकर यानी पोट तिटकिने मळव येथील सडाने पेटली बिजली या नाट्य प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना मांडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंगापा पार्सेकर होते.
तर नाटकाचे उदघाटन म्हणून माजी आमदार अरविंद पाटील यानी फित कापून केले.
व्यासपिठावर भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल,अर्बन बॅकेचे चेअरमन अमृत शेलार ,गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे सदस्य प्रसाद पाटील,भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई ,अर्जून कांबळे,राजू धुरी,यशवंत पाटील,तर प्रमुख वक्ता म्हणून पत्रकार वासुदेव चौगुले आदी उपस्थित होते.
प्रारंभी दिपप्रज्वलनाने व फोटो पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील , संजय कुबल,अर्जून का़बळे ,राजू धुरी सह अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावचे सातेरी पार्शेकर,सहदेव भातंकाडे,रामू कदम,मारूती नाईक ,राजाराम शास्त्री ,सह गावचे पंच उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश देसाई,सुत्रसंचालन जोस्ना पार्शेकर यानी केले.