
# हत्तीचा कळप!त्यात तीन पिल्लाचा समावेश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्या हा अतिजंगलमय तालुका म्हणून ओळखला जातो.तालुक्याच्या काही जंगल भागात ऐन सुगीच्या काळात हत्तीच्या कळपाने बस्तान बसविले असुन हाता तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.
मडवाळ ( ता .खानापूर ) गावच्या शिवारात सर्वे नंबर ६७ मधील बिलगावडे रांग मधील रामु यल्लापा बिलगावडे याच्या भात पिकांचे तसेच सर्वे नंबर ८८ मधील कोमणाची रांग मधील रामु दळवी यांच्या भात पिकाचे रविवारी रात्री ९ हत्तीच्या कळपाने भातपिक तुडवुन प्रचंड नुकसान केले आहे.
याबाबत मडवाळचे भाजप नेते बाबा देसाई यानी हत्तीकडुन झालेल्या भात पिकाची दखल घेत सबंधीत वनखात्याच्या ए सी एफ ,आर एफ ओ. व फाॅरेस्टरना चांगलेच धारेवर धरत हत्तीकडुन सातत्याने होणारे नुकसान हे तुमच्या दुर्लक्षपामुळे होत आहे.
दर वर्षीच हत्ती ऐन सुगीच्या दिवसात येतात याची कल्पना असुन सुध्दा त्याच काहीच देण घेण लागत नाही.
तुम्ही तुमच्या जंगली जनावरना सांभाळा आमच्या पिकांचे नुकसान का करता.असा सवाल केला.
यावेळी संबधीत खात्याच्या वनअधिकार्यानी हत्तीना घालविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे.सांगीतले.
यावेळी भाजप नेते बाबा देसाई यानी शेतकर्यांच्या प्रचंड नुकसान भात पिकाची पाहणी करून त्याना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवुन द्या.अशी सुचना केली.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होेेते.