
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहरातील मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलमध्ये रविवारी मोठ्या उत्साहाने आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी हायस्कूलचे मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी यांच्या शुभहस्ते भारतीय लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले तर नंतर मराठा मंडळ हायस्कूलचे सहशिक्षक जे डी बिर्जे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही राज्याची संकल्पना व त्याचे महत्त्व विषद केले त्यानंतर अध्यक्ष समारोप करताना हायस्कूलचे मुख्याध्यापक के व्ही. कुलकर्णी सर यांनी भारतीय लोकशाही ही जगात सर्वात मोठी लोकशाही असून या लोकशाहीने प्रत्येक भारतीयाला त्यांचे मूलभूत हक्क दिले आहेत व त्या हक्काच्या संरक्षणासाठी .आम्ही सर्वजण जागृत व दक्ष राहिले पाहिजे असे विचार मांडले शेवटी सर्व विद्यार्थी वर्दे पेट्रोल पंप पासून शिवस्मारक चौकापर्यंत येऊन त्या चौकामध्ये मानवी साखळीच्या स्वरूपात लोकशाहीचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब की जय अशा घोषणा दिल्या व त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.