
#खानापूर तालुका क्राॅगेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांचा सवाल?
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांची संजीवनी म्हणून ओळखणार्या लैला साखर कारखाण्याचा यंदाचा सन २०२४-२५ सालातील गळीत हंगाम डिसेंबर महिण्याचा दुसरा आठवडा आला. तरी गळीत हंगाम सुरू नाही.
याबद्दल बोलताना खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की,
माजी आमदार निळकंठ राव सरदेसाई यांनी खानापूर तालुक्याला संजीवनी मिळावी म्हणून अथक परिश्रम घेऊन भाग्यलक्ष्मी साखर कारखाना उभा केला.
त्या अनुषंगाने थोडे दिवस सरकार तत्त्वावरती कारखाना चालला परंतु त्यानंतर अनेक कारणाने कारखाना बंद पडला. त्यानंतर कैलासवासी माजी आमदार प्रल्हाद रिमाणी यांनी भाडेतत्त्वावरती लैला शुगर्सला कारखाना लिज वरती दिला.त्यानंतर पुन्हा लैला शुगर नी सब लिस्ट वरती महालक्ष्मी प्रणित विठ्ठल हलगेकर सध्याचे विद्यमान आमदार यांनी चालवायला घेतला दोन-तीन वर्ष सुरळीतपणे गळीत हंगाम झाला परंतु यावर्षी डिसेंबर मध्यावधी होऊन सुद्धा अजून सुद्धा कारखाना का चालू झाला नाही हा यक्षप्रश्न निर्माण होतो . बॉयलर रिपेरी चे निमित्त दाखवून आत्तापर्यंत दिरंगाई होत आहे. मला असे वाटते की आज-काल अद्यावत मशनरी असून सुद्धा का बर इतकी दिरंगाई होते हा प्रश्न निर्माण होतोय कारण बऱ्यापैकी चांगला ऊस महाराष्ट्रामध्ये जात आहे आणि जर करता स्थानिक आमच्या शेतकऱ्यांचा ऊस जर करता गेला नाही तर मात्र याचा परिणाम शेतकऱ्यावरती होणार आणि झालेल्या परिणामाला शुगर फॅक्टरी चे कारभारीच जबाबदार राहणार त्यामुळे कृपया होत्या विल तेवढ्या लवकर कारखाना चालू करावा कारण प्राप्त परिस्थितीनुसार अद्याप खानापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा ऊस दहा लाख टन पर्यंत शिल्लक आहे तेव्हा कृपया मी संचालकांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ कारखाना चालू करावा आणि या माझ्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस तात्काळ उचल करून त्यांना योग्य न्याय द्यावा .
असे मत व्यक्त केले.