
# खानापूर मए समितीचे बीईओना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरापसुन जवळ असलेल्या शिवाजीनगरातील पूर्व प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षकाची टेप्यूटेशनवर अन्यत्र बदली करण्यात आली ती बदली रद्द करावी.
अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी दि. २५ रोजी तालुका क्षेत्र शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूरला लागुन असलेल्या शिवाजीनगरातील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते पाचवीपर्यतचे वर्ग असुन १७ विद्यार्थी आहे.
नियमानुसार दोन मराठी शिक्षक व एक कन्नड शिक्षक कार्यरत असताना त्यातील एका मराठी शिक्षकाची टेप्यूटशनवर बदली करण्यात आली. त्यामुळे एकाच शिक्षकावर मुख्याध्यापक पदाची तसेच पाच वर्गाची जबाबदारी पडत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. डेप्यूटेशन शिक्षकाची बदली रद्द करावी. व दोन मराठी शिक्षक कायमस्वरूप नेमावे असे म्हटले आहे.
यावेळी क्षेत्रशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यानी निवेदनाचा स्विकार करून डेप्यूटशन शिक्षकाची बदली रद्द करून दोन शिक्षक देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील, खानापूर म ए समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणी आबासाहेब दळवी,समितीचे नेते गोपाळ पाटील ,माजी ता प सदस्य पांडुरंग सावंत, बाळासाहेब शेलार,प्रकाश चव्हाण ,माजी जि.प.सदस्य जयराम देसाई,के एम मनोळकर,संजीव पाटील, आदी उपस्थित होते.