
# बेळगाव हिवाळी अधिवेशनविरोधात महामेळाव्याबाबत चर्चा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची संयुक्त बैठक आज सोमवारी दि २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता खानापूर शहरातील राजा शिवछत्रपती स्मारकातील माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे .
आजच्या बैठकीत कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथे होणार्या हिवाळी अधिवेशन विरोधातील महामेळाव्या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
तरी आजी माजी पदाधिकारी ,कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आपले विचार व्यक्त करावे.
असे आवाहन खानापूर तालुका म ए समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई,माजी आमदार दिगंबर पाटील,कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील ,सरचिटणीस आबासाहेब दळवी यानी केले आहे.