
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानपूर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकास कुमार यानी बजावला आहे.
बेळगाव अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावरील अपशब्दावरून भाजपचे एम एल सी माजी मंत्री सी टी रवी यांच्यावर गुन्हा दाखल होऊण खानापूर पोलिस स्थानकात आणले असता. त्याठिकाणी आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सुचना पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक याना करण्यात आली होती. परंतु पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यानी हलगर्जीपणा केल्यामुळे गोंधळ उडला.कायदा व सुव्यवस्था हताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक याना निलंबीत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.