
#वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाबद्दल कौतुक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
कर्नाटक राज्य मानवहक्क समिती बेंगलोरचे सदस्य एस के ओंटागोडी यानी शुक्रवारी दि ८ रोजी खानापूर येथील समाजकल्याण सरकारी मुलांच्या वस्तीगृहाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी सोशल वेलफेर अधिकारी एन व्ही नागनुर यानी स्वागत केले.वस्तीगृहातील स्वच्छता,रेशन,याची तपासणी केली.
तसेच वस्तीगृहातील जेवणाची चव घेतली .तसेच विद्यार्थ्याच्या प्रवेशाबद्दल माहिती घेतली.त्यानंतर समाजकल्याण सरकारी मुलांच्या वस्तीगृहाबद्दल कौतुक करून चांगला रिपोर्ट दिला. पुढे भविष्यात अशीच व्यवस्था ठेवा असा सल्ला दिला.
याप्रसंगी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड,सोशल वेल्फेअर आँफिसर एन व्ही नागनुर,तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, तसेच हाॅस्टलचे सुपरवाझर गिरीष कुरहट्टी व इतर तालुका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुपरवाइझर गिरीष कुरहट्टी यानी आभार मानले.