
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील तहसील कार्यालयात सालाबाद प्रमाणे यंदाही शासकीय बौध्द जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपतहसीलदार के आर कोलकार यांनी बौध्दाच्या फोटो प्रतिमेचे पुजन केेले.
तर व्ही.आर.मॅगेरी यांनी दीपप्रज्वलन करून पुजन केले.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी याच्याहस्ते बुध्दांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,तहसील कार्यालयाचे उपतहसीलदार के.आर.कोलकार, व्ही.आर.मॅगेरी, मंजू संगमणावर, विनायक मडीवार,सुनिल देसाई, मोशीन दर्गावाले, श्री विनायक ,श्री जवळी आदी मान्यवर उपस्थित होते.