
#वैद्यकिय कचरा बेळगावचा काॅन्ट्रँक्टर घेऊन जाणार! ८ दिवसातुन एकदा!
#वैद्यकीय कचरा कुठ ही टाकू नये!
,संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर शहरातील वैद्यकिय कचरा एकत्रीत टाकण्यासाठी रेल्वेस्टेशन रोडवरील पोष्ट आँफिस शेजारी वैद्यकीय कचरा बाॅक्स होता.
मात्र येथील पोष्ट आँफिसची,नगरपंचायतीची तसेच नागरीक आदीची वरचेवर तक्रार होत होती.त्यामुळे वैद्यकिय कचरा तेथून हलविला आहे.
यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जे (के पी एम ई कर्नाटक प्राव्हेट मेडिकइस्टँब्लिशमेट अँक्ट प्रमाणे जे डाॅक्टर आहेत.त्याच्या वैद्यकी कचरा उचलण्यासाठी बेळगावच्या काॅंट्रँक्टर्सना काम देण्यात आले आहे. आठ दिवसातुन एकदा शहरातील प्रत्येक दवाखाण्यातील वैद्यकीय कचरा उचलणार आहे.
त्यासाठी वैद्यकिय कचरा कुठही टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे.त्याची काटेकोरपणे सर्वानी अमंलबजावणी करणे गरजेचे आहे. तेव्हा सर्वानी वैद्यकीय कचरा कोणी ही कुठे ही टाकू नये.
असे आवाहन खानापूर तालुका डाॅक्टर असोसीएशन अध्यक्ष डाॅ.डी.ई.नाडगौडा व डाॅ.सुनिल पाटील यानी केले आहे.