
संदेश क्रांती न््यू
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर तालुका रेशन दुकानदार संघटनेची बैठक नुकताच पार पडली.
यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष महादेव दळवी यानी घरगुती आडचणीमुळे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेच्या तालुका नुतन अध्यक्ष पदी माडीगुंजी चे वैभव कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना
नुतन अध्यक्ष वैभव कुलकर्णी बोलताना म्हणाले की, सर्व दुकानदारांना तसेच माजी अध्यक्ष दळवी व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष सिनियर नेते चमान्ना होसमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करणार असल्याचे सांगितले असून तालुक्यातील गोर गरीब व सामान्य जनतेस रेशनचा वेळेवर आणि योग्य ते रेशन पुरवठा करण्यावर भर देणार असल्याचे नुतन अध्यक्ष यांनी सांगितले असून या निवडीसाठी वैभव कुलकर्णी यांनी सर्व राशन दुकानदार , खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर तसेच पंचहमी योजनेचे तालुका अध्यक्ष सुर्यकातं कुलकर्णी व सर्व सदस्य यांचे आभार मानले.