
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी हायस्कूलमधुन सहना मुल्ला हिने ७१ .५२ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. तर प्रियांका पटेल हिने ७०.२४ टक्के गुण घेऊन व्दितीय क्रमांक पटकाविला. तृतीय क्रमांक प्रितेश पाखरे याने ६८.९६ टक्के गुण यश संपादन केले.
तर जैनाब मुजावर ६८.८० टक्के गुण चौथा क्रमांक घेतला. पाचवा क्रमांक प्रतिक घाडी याने ६६.२४ टक्के मिळविले. यंदाचा समर्थ इंग्रजी हायस्कूलचा निकाल ५० टक्के लागला आहे.
यशस्वी विद्यार्थ्याचे समर्थ इंग्रजी हायस्कूलचे सचीव डाॅ डी ई नाडगौड व संचालक मंडळाने अभिनंदन केले. पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.