
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर येथील प्रथम दर्जा महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनीची राणी चन्नमा विद्यापिठाच्या पहिल्या टाॅप टेन यादीत समावेश झाल्याने महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे.
खानापूर सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयातील बीबीए अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी कुमारी संगीता पाटील हिने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राणी चन्नमा विद्यापिठात सहावा रँक तर कुमारी स्नेहा मिटगार हिने आठवा रँक पटकाविला.
जुलै २०२४ मध्ये राणी चन्नमा विद्यापिठाने अंतिम सत्राच्या परीक्षा घेतल्या होत्या.मार्च २०२५ मध्ये विद्यापिठाने जाहिर केलेल्या टाॅप टेन यादीत खानापूर प्रथम दर्जा सरकारी काॅलेजच्या दोन विद्यार्थीनीनी यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले.
या यशामागे खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दिलीप जवळकर यानी विद्यार्थ्याच्या कठोर परिश्रमाची दखल घेऊन गौरव केला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्य डाॅ.दिलीप जवळकर,विभाग प्रमुख डाॅ. सोनल रेवणकर,यांच्यासह इतर प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.