
#विद्यार्थ्याचे उत्साहात स्वागत!
संदेश क्रा़ंती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील मराठा मंडळ संस्थेच्या मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलमध्ये शुक्रवारी दि.३० मे रोजी नविन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
शाळा प्रारंभोत्सवाला संस्थेेचे संचालक शिवाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक के.व्ही.कुलकर्णी यानी प्रास्ताविक करून उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले.
यावेळी संचालक शिवाजी पाटील यानी फित कापून शाळा प्रारंभोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन केले.त्यानंतर विद्यार्थ्याना हायस्कूलमध्ये प्रवेश दिला.
प्रारंभी पाहुण्यांच्याहस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना संचालक शिवाजी पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यानी शाळेत नियमित हजर राहुन संस्थेच्या तसेच सरकारच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा. तसेच उत्तम नागरीक बनावे.व शाळेचे तसेच पालकांचे नाव उज्वल करावे. असे मार्गदर्शन केले.
शेवटी मुख्याध्यापक के.व्ही.कुलकर्णी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यानी नियमित शाळेला उपस्थित राहुन चांगले ज्ञान आत्मसात करावे.असे सांगीतले.
आभार जे.डी.बिरजे यानी मानले.