
#४ हाॅकी पट्टू खेळांडू स्पोर्टस् हाॅस्टेलसाठी म्हैसुरला रवाना!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात इतकी वर्षे हाॅकी खेळाचा गंधही नव्हंता. त्याच तालुक्यातील चार हाॅकी खेळाची सुरूवात होऊन चक्क ताराराणी हायस्कूलच्या ४ हाॅकी पट्टू मुलींची म्हैसुर येथील युथ स्पोर्टस् हाॅस्टेल साठी निवड झाली. त्यामुळे खानापूरच्या ४ हाॅकी पट्टू मुलीनी खानापूरचा लौकीकात मानाचा तुरा रोवला. आज त्या म्हैसुर येथे स्पोर्टस हाॅस्टेलसाठी रवाना झाल्या.
त्यानिमित्त खानापूर बसस्थानकात ४ हाॅकी खेळांडुचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हाॅकी कोच निवृत्त सैनिक गणपत गावडे, भाजपचे नेते राजेंद्र रायका तसेच पालक उपस्थित होते.
यावेळी भाजप नेते राजेंद्र रायका यानी हाॅकी पट्टूचे पुष्पहार घालुन व पेढे भरवुन सत्कार केले.
हाॅकी खेळात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनींची म्हैसूर येथील युथ स्पोर्ट्स हाॅस्टेलसाठी येथील एक नाही दोन नाही तर तब्बल चार विद्यार्थिनींची निवड झाली असून या विद्यार्थिनीं कु. मयुरी प्रमोद कंग्राळकर, साक्षी संदीप पाटील,साक्षी संभाजी चौगुले, व आयेशा शौकत अली शेख या चार ही हाॅकी खेळांडुना निरोप देण्यात आला.
यावेळी पालक उपस्थित होते.