
#तहसीलदार ,सीपीआय,चीफआँफिसर अधिकार्याना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज.
खानापूर प्रतिनिधी
गेल्या महिण्याभरा पासुन खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचार्यानी सरकारकडे आपल्या मागणीचे निवेदन दिले होते.मात्र मागणीच्या निवेदनाला कचर्याची टोपली दाखवल्याने खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचार्यानी शुक्रवारी दि.३० पासुन कामबंद करत बेमुदत संप करत मोर्चाने तहसीलदार ,सी पी आय व चीफ आँफिसर अधिकार्याना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या.
यावेळी कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजू जांबोटी म्हणाले की ,नगरपंचायतीच्या रोजंदारी कर्मचारी व इतर कर्मच्याना कल्याण विकास कायद्यांतर्गत नोकरीत कायमस्वरूपी करण़े.
सन २०२२मध्ये विशेष भरतीअंतर्गत निवड झालेल्या नगरपंचायतीच्या सेवकासाठी,लोडरसाठी स्वच्छता कामगार व इतर कर्मचार्याना एस.एफ.सी.योजनेच्या निधीतुन वेतन द्यावे.
नगरपंचायतीच्या विशेष नियुक्ती अंतर्गत शहर नगरपंचायतीत काम करणार्या पाणी पुरवठा करणार्या कर्मचार्याचा विशेष नेमणुकी बाबत विचार करणे.
आय.टी.कर्मचारी अकाऊटंट, काँप्यूटर आँपरेटर,ड्राव्हर,एस.आय. व इतर स्वच्छता कर्मचार्याची नगरपंचायत कर्मचारी म्हणून विलिनीकरण करणे.
नगरपंचायतीच्या कर्मचार्याना ज्योती संजीवनी \ कॅशलेस उपचार आदी सुविद्या पुरविणे. येत्या २ जुन पासुन पाणीपुरवठा बंद करून संप चालु राहणार आहे.अशा मागण्याचे निवंदेन नगरपंचायतीच्या अधिकारी सौ. राजश्री वर्णेकर याना देण्यात आले.
निवेदन देताना नगरपंचायत नोकर संघाचे अध्यक्ष राजू जांबोटी, प्रेमानंद नाईक,गंगाधर कांबळे, सह कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपतहसीलदार के आर.कोलकार याना निवेदन देण्यात आले.
उपतहसीलदार के आर कोलकार यानी निवेदनाचा स्विकार करून निवेदन सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.