
#दोन पॅनल मध्ये चुरशीचे मतदान!
#चेअरमन पदासाठी महेश कुंभार व आय. जे. बपारी यांच्या लढत!
#महेश कुंभार याना ८ मते.तर आय.जे.बपारी याना ७ मते!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील)
खानापूर शहरातील खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणुक शुक्रवारी दि.२३ रोजी मोठ्या चुरशीने पार पडली.
प्रारंभी चेअरमन पदाची निवड बीन विरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसा पासुन प्रयत्न सुरू होते .मात्र त्याला शेवट पर्यत यश आले नाही. त्यामुळे शुक्रवारी दि.२३ रोजी सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन पदाची निवडणुक मोठ्या चुरशीने पार पडली.
या निवडणुकीत चेअरमन पदासाठी इदलहोंड मराठी शाळेचे मुख्याध्यापक महेश कुंभार व माजी चेअरमन आय.जे.बेपारी यानी अर्ज केले होते.
शुक्रवारी सकाळी मतदानाला सुरूवात झाली.यावेळी १५ संचालका पैकी ८संचालकाची मते महेश कुंभार याना पडली .तर ७ संचालकाची मते आय.जे.बेपारी याना पडली.
याचुरशीच्या निवडणुकीत केवळ एक मताने महेश कुंभार याना विजय प्राप्त झाला.
यावेळी सर्व संचालकान नुतन चेअरमन महेश कुंभार यांचे पुष्पहार व पेढे भरूवुन अभिनंदन केले.
यावेळी माजी चेअरमन वाय.एम.पाटील,व्हाईस चेअरमन एस डी.सोनारवाडकर, संचालक आय जे बेपारी,के एच कौंदलकर,सतीश हळदनकर,प्रकाश मादार,जे.पी.पाटील, नेताजी शिवनगेकर, बी बी चापगांवकर, लक्ष्मण गुरव वसंचालिका सौ जे.ए.मुरगोड,श्रीमती मीरा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक एस.टी.पाटील ,माजी चेअरमन बबन पाटील, एम व्ही.पाटील,के.एम पाटील ,गोविंद पाटील,जोतिबा घाडी,ओ.एन मादार,एम.व्ही चोर्लेकर,मोहन पाटील,श्री बिरादार व श्रीमती ए डी चोपडे आदी उपस्थित होते.
उपस्थितांची नुतन चेअरमनना शुभेच्छा व सोसायटीच्या प्रगती बद्दल विचार व्यक्त केले.
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून नविन हुलकुंद यानी काम पाहिले.
नुतन चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल महेश कुंभार याचे शिक्षकवर्गातुन व तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.