
जांबोटी सर्कलपासुन तिरंगा यात्रेला प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील जांबोटी सर्कल बसवेश्वर चौकातून शुक्रवारी सकाळी ११ वाजता तिरंगा यात्रेला सुरूवात झाली.
यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी,आमदार विठ्ठल हलगेकर ,माजी आमदार अरविंद पाटील, अवरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरू ,स्वामी शिवलिंग प्रभू,भाजपा जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष प्रमोद कोचोरी, माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल ,माजी जि.प. सदस्य जोतिबा रेमाणी, सेक्रेटरी गुंडु तोपिनकट्टी ,जाॅर्डन गोन्साल्वीस व तालुक्यातील विविध माजी सैनिक संघटनेचे तसेच गर्लगुंजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव मेलगे व पदाधिकारी व माजी सैनिक इतर भाजप कार्यकर्त्याच्या उपस्थितीत खासदार विश्वेश्वेर हेगडे कागेरी ,आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते भारत मातेच्या फोटो प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील गर्लगुंजीसह खानापूर व इतर गावच्या निवृत माजी सैनिकानी व अंगणवाडी शिक्षिकानी हातात तिरंगा ध्वज घेऊन तिरंगा यात्रेची सुरूवात बसवेश्वर सर्कल मध्ये करून तिरंगा यात्रेची फेरी बेळगाव पणजी महामार्गावरून, शिवस्मारक चौक ,स्टेशन रोड,ज्ञानेश्वर मंदिर ,बाजारपेठ मार्गे,चौराशी मंदिर पर्यंत काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम असे नारे देत राष्ट्रीय अभिमान व्यक्त केला.
यावेळी खानापूरची ग्राम देवता चौराशी मंदिर समोर सांगता समारंभात बोलताना
खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यानी भारतीय सैनिकांचे हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील
,आमदार विठ्ठल हलगेकर, स्वामी चन्नबसव देवरू व माजी सैनिकानी विचार व्यक्त केले.
यावेळी विविध पक्षाचे नेते ,व विविध संघटनेचे नेते,तसेच माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच
वारकरी ,विद्यार्थी,महिला मंडळे व नागरीक सहभागी झाले होते.
.देशाच्या सैनिकाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सैनिकाचे मनोबल वाढविण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मल्लाप्पा मारीहाळ यानी केले. आभार आमदार विठ्ठल हलगेकर यानी मानले.