
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शुक्रवारी दि .२३ रोजी खानापूर शहरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसवेश्वर चौकातून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता यात्रेला सुरूवात होणार आहे.
त्यानंतर बेळगाव पणजी महामार्गावरून, शिवस्मारक चौक ,स्टेशन रोड,ज्ञानेश्वर मंदिर ,बाजारपेठ मार्गे,चौराशी मंदिर समोर सांगता होणार आहे.
तिरंगा यात्रेत खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी,आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील , भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचोरी, माजी अध्यक्ष संजय कुबल, तसेच विविध पक्षाचे नेते ,व विविध संघटनेचे नेते,तसेच माजी सैनिक,वारकरी ,विद्यार्थी,महिला मंडळे व नागरीक सहभागी होणार आहेत.देशाच्या सैनिकाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सैनिकाचे मनोबल वाढविण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील नागरीकानी यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.