
#कुस्तीआखाड्यात सोनु हरियाणा -पृथ्वीराज मोहोळे यांच्यात प्रमुख लढत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
सालाबाद प्रमाणे यंदाही खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने रविवारी दि.१८ रोजी दुपारी ३ वाजता येथील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत केसरी सोनु कुमार हरियाणा विरूध्द महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळे यांच्यात होणार आहे.
दुसर्या क्रमांकाची कुस्ती पै.शुभम सिदनाळे विरूध्द पै.पवन कुमार,तिसर्या क्रमांकाची कुस्ती पै.कार्तिक काटे विरूध्द पै.संदिप मोटे यांच्यात होणार आहे.
याशिवाय महिला कुस्ती पै.शिवानी वड्डेबैल विरूध्द पै.वैष्णवी कुसमळी व पै.ऋतुजा वडगांव विरूध्द पै.भक्ती मोदेकोप यांच्यात होणार आहे.
मेंढा कुस्ती पै.पंकज चापगांव विरूध्द पै.रामदास काकती,व पै.महेश तिर्थकुंडे विरूध्द पै.काशिलिंग जमखंडी यांच्यात होणार आहे.
याशिवाय अकर्षक कुस्ती पै.पार्थ कंग्राळी विरूध्द पै.संजू दावणगेरी , पै.प्रथमेश हट्टीकर विरूध्द पै.सुरेश लंगोटी, पै.सिंध्दात मजगाव विरूध्द पै.स्वराज सावगाव यांच्यात होणार आहे.
याजबरोबर या आखाड्यात जवळपास ५० हुनअधिक कुस्त्या होणार आहेत.
यावेळी कुस्ती आखाडा समारंभाचे अध्यक्ष आमदार विठ्ठल हलगेकर राहणार आहेत .कुस्ती आखाड्याचे उदघाटन नासीर बागवान यांच्याहस्ते होणार आहे. तर पुजन माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
दिपप्रज्वलन व फोटो पुजन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या कुस्ती आखाड्याचा लाभ तालुक्यातील कुस्तीशौकीनानी घ्यावा.असे आवाहन खानापूर कुस्तीगीर संघटनेचेअध्यक्ष हणमंत गुरव (गणेबैल) व इतर पदाधिकार्यानी केले आहे.