
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सरकारी शाळा टिकविण्यासाठी सरकारने आमची शाळा आमची जबाबदारी ही योजना राबवुन सरकारी शाळा टिकविण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील मराठी मुलांच्या शाळेत गुरूवारी दि १५ रोजी आमची शाळा आमची जबाबदारी या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर बीईओ पी.रामाप्पा, समन्वय अधिकारी ए आर अंबगी, आक्षरदासोह अधिकारी महांतेश कित्तूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बीईओ पी रामाप्पा यानी आमदार विठ्ठल हलगेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की,सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी आमची शाळा आमची जबाबदारी ही योजना राबवताना ही जबाबदारी सर्वाचीच आहे. याकडे कुणी लक्ष दिल पाहिजे हा मोठा प्रश्न आहे
अलीकडे शिक्षकासह ,अधिकारी , लोकप्रतिनिधी सर्वचजन खासगी शाळेत इंग्रजी माध्यम मध्ये आपली मुले शिक्षणासाठी पाठवितात. मग सरकारी शाळाना कुणाची मुल येणार. सरकारी शाळा टिकणार कशा याकडे सरकराने लक्ष दिले पाहिजे .
शिक्षक आपल्या शाळेत आपली मुल पाठविण्यास राजी नसतात.आपल्या मुलाना खासगी शाळेत इंग्रजी माध्यम कडे पाठविण्याचा ओढा असतो.त्यामुळे सरकारी शाळा बंद पंडण्याच्या मार्गावर आहे.याचा विचार सरकारने केला पाहिजेत. तर सरकारी शाळा टिकणार. तर दुसरीकडे अनेक लोकप्रतिनिधी खासगी शाळा स्थापन करून इंग्रजी शाळाचे पेव तयार करत आहे. याचा ही विचार होणे गरजेचे आहे.
यावेळी आमची शाळा आमची जबाबारी या संदर्भात सरकारच्या सवलती यावर सौ.सांबरेकर तसेच माध्यान्ह आहार योजनेबद्दल अक्षरदासोह अधिकारी महातेश कित्तूर आधीनी माहिती दिली .
यावेळी शिक्षक ,पालक, एसडीएम सदस्य ,सीआरपी ,बीआरपी आदी उपस्थित होते.
प्रारंभी सीआरपी ए.बी.देसाई यानी प्रास्ताविक केले.तर श्री चिचडी यानी सुत्रसंचालन केले.आभार श्री जनकट्टी यानी मानले.