
#आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते फित कापून उदघाटन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील एम.बी.काप्लेक्स रमेश मेडीलच्या शेजारी श्री नागेश गोल्डस्मित सराफी दुकानचे उदघाटन मंगळवारी दि.१३ रोजी सकाळी ११ वाजता तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.
प्रारंभी कु.ओमकार एम बांदीवडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उदघाटन कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर,भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, श्री महालक्ष्मी ग्रुपचे संचालक महादेव बांदेवडेकर व इतर संचालक, जनरल मॅनेजर तुकाराम हुंदरे, व विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्य नारायण महापुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की,श्री नागेश गोल्ड स्मित हे गेल्या कित्येक वर्षापासुन सोन्या ,चांदीचे दुकान चालवितात.आता त्यानी या व्यवसायात मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आज खानापूर शहरात त्यानी मोठे सोन्या,चांदीचे सराफी दुकान उभारले.आता या श्री नागेश गोल्ड स्मित सराफी दुकान सर्व प्रकाराचे सोन्या,चांदीचे दागीने मिळतात.त्याचा तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
कार्यक्रमाला सामाजिक ,राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ओमकार बांदीवडेकर यानी श्री नागेश गोल्डस्मित सराफी दुकानात सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागीने वेळेत मिळतील. तेव्हा एक वेळ जरूर भेट द्या.असे आवाहन केले.
शेवटी आभार लक्ष्मण गुरव यांनी मानले.