
#गुरूवारी एम.बी एस शाळा चिरमुरकर गल्ली खानापूर !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
पालकानी आपल्या मुलाना सरकारी शाळेत पाठवुन सरकारी योजनाचा लाभ पाल्याना मिळवून द्यावा.यासाठी गुरूवारी दि.१५ रोजी खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील एम. बी एस स्कूल मध्ये सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजपर्यत हा कार्यक्रम होणार आहे.
तेव्हा शाळा ही समाजाची संपत्ती आहे. आणि तुमची मुले शाळेत शिकत आहेत.यासाठी कर्नाटक सरकारने सरकारी शाळेतील मुलासाठी दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा आणि चांगल्या आरोग्यासाठी माध्यान्ह आहार तसेच प्रोहोत्सान दिले आहे.
सरकारने दर्जेदार शिक्षक ,सुसज्ज वर्ग, प्रयोगशाळा,वाचनालय,मोफत गणवेश ,पाठ्यपुस्तक ,शुज,साॅक्स ,क्षीर भाग्य योजना ,आठवड्यातुन पाच दिवस गरम दुध,नाचणी मॅाल्ट,केळी,अंडीचे वाटप आदी योजना राबवत आहेत.
तेव्हा या योजनाच्या सुविधा व प्रोहोत्सानाबद्दल जागृक्ता निर्माण करणे,तसेच कुपोषण ,अशक्तपणा व विविध पोषणाची कमतरता टाळण्यासाठी व सरकारी शाळामध्ये कार्यक्रमाची जागृक्ता करण्यासाठी व जास्तीत जास्त मुलांना प्रवेश घेण्यासाठी प्रोहोत्साहीत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा शाळा सुधारणा कमिटी,पालक ,मुख्याध्यापक ,शिक्षकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.