
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिी
कौलापूर ( ता.खानापूर ) येथील श्री लोपेश्र्वर देवस्थान कमिटी व ग्रामस्थाकडून मंगळवार दि.३० रोजी जिल्हा अधिकारी,सीईओ, व पोलिस अधिकारी अदीना यांना निवेदेन देवून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी केली.
निवेदना मध्ये म्हटले आहे की,जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी क्वालिटी अॅनिमल फीड्स प्रा. लि. – (हॅचरी प्रकल्प) या कंपनीला दिलेले फेसीबीलिटी सर्टीफिकेट चुकीच्या पद्धतीने दिले गेले आहे आणि यामुळे आमच्या गावाला व समुदायाच्या आरोग्य आणि कल्याणाला मोठा धोका उद्भवू शकतो.
या सर्टिफिकीटीमध्ये कौलापुर गाव कंपनीपासून २ किलोमीटर पूर्वेकडे आहे आणि आजूबाजूला फक्त शेतीची जमीन आहे अशे चुकीचे दिले आहे, क्वालिटी अॅनिमल फीड्स प्रा. लि. – (हॅचरी प्रकल्प) केवळ ३० फूट अंतरावर कौलापूर गावाजवळ आहे. ही चुकीची माहिती देवून हॅचरी प्रोजेक्टसाठी क्वालिटी ॲनिमल फीडस् प्रा.लिमिटेड कंपनी परवांनगी घ्यायचा प्रयत्न करत आहेत.असे झाल्यास केवळ आमच्या भौगोलिक वास्तवाचा गैरप्रचार करत नाही . तर आमच्या गावकऱ्यांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला धोका पोहोचवते.
या प्रकरणातील संबंधित अधिकार्यांच्या दुर्लक्ष आणि अन्यायकारक वर्तनामुळे आम्हाला फारच त्रास होत आहे. असे अधिकारी आमच्या जीवांसोबत खेळ करत आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेता. या निर्णयासाठी जबाबदार अधिकारी तातडीने निलंबित करण्यात यावेत आणि क्वालिटी अॅनिमल फीड्स प्रा. लि. – (हॅचरी प्रकल्प) ला दिलेले फेसीबीलीटी सिर्टीफिकेट तात्काळ रद्द करण्यासाठी योग्य कारवाई करावी.
कौलापुर गावाच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी आणि असे अन्याय पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घ्यावी. अशी विनंती करण्यात आली.
यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गंगाराम बावदाने व गावकरी उपस्थित होते.