
#रात्री सह्याद्रीचा सिंह गर्जतो पोवाडा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
कौंदल ( ता. खानापूर )येथे सालाबाद प्रमाणे यंदाही श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा बुधवारी दि .१३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.!”
बुधवारी दि .१३ रोजी सकाळी १० ते १२ पर्यत वाजे पर्यंत गावातुन श्रीमाऊली देवीची गावातुन वाजत गाजत मिरवणूक त्यानंतर दुपारी १ ते ३ पर्यत महाप्रसादाचे आयोजन.
सायंकाळी ६ वाजता श्रीमाऊली देवीचा कार्तिकोत्सव सोहळा,व आरती.
सायंकाळी ७ .३० वाजता श्री हनुमान कार्तिकोत्सव व तुळशी विवाह, रात्री ८ वाजता,महाप्रसाद होऊन या `उ़त्सवाची सांगता होणार आहे.
यावेळी रात्र १० वाजता सह्याद्रीचा सिंह गर्जना हा पोवाड सादर करण्यात येणार तरी भाविकानी श्री माऊली देवी कार्तिकी सोहळा तसेच पोवाड्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौदल ग्रामपंचायत सदस्य उदय भोसले यानी केले आहे.