
#करंबळच्या वेशीत वृक्ष कोसळला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहरासह तालुक्यात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वळवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी सुसाट वार्यासह जोराचा पाऊस झाला. याचवेळी खानापूर नंदगड मार्गावरील करंबळ (ता.खानापूर ) गावच्यावेशीत भला मोठा वृक्ष कोसळुन महामार्गावरील वहातुक काही काळ ठप्प झाली.
यावेळी करंबळ गावच्या नागरीकांनी पडलेल्या वृक्षाच्या फांद्या तोडुन रस्ता वहातुकीस मोकळा केला. लागलीच वनखात्याला माहिती देऊन ही वनखात्याने उशीरा हजेरी लावली.तो पर्यत नागरीकानी रस्ता मोकळा केला.
तालुक्यातील लालवाडी ,बेकवाड आदी भागात वळवाच्या पावसाने शिवारात पाणीच पाणी केले.
बेकवाड भागात ही सुसाट वार्यामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी माहिती बेकवाडचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाळेकुंद्री यानी दिली.
खानापूर तालुक्यात वळवाच्या पावसाची प्रतिक्षा शेतकर्यातुन होत होती.सकाळ पासुनच हवेत उष्मा होता.जीवाची लाही लाही होत होती.संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सुसाट वार्यासह वळवाच्या पाऊसाला प्रारंभ झाला.