
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
कणकुंबी (ता.खानापूर ) येथील श्री माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक व कालमणी गावचे सुपूत्र सुनिल गणपती चिगुळकर याना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्कार कराड येथील स्व.यशवंत चव्हाण नगरीत सन्मानित करण्यात आला.
हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य परिषदेच्या उदघाटन प्रसंगी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ,व माजी शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे,यांच्या उपस्थितीत “लोकशाही” टीव्ही चॅनलचे संपादक विशाल पाटील,आणि आखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ.शरद गोरे यांच्याहस्ते शनिवारी दि १० मे रोजी महात्मा फुले शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला
यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक ,गोवा आदी राज्यातील अनेक कवी ,लेखक,विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.