
संदेश क्रांती न्यूज :
कणकुंबी ( ता.खानापूर ) येथील विश्व भारत सेवा समिती संचलित श्री माऊली विद्यालयात दहावीच्या प्रथम परीक्षेत ईशा रामा चौगुले (चिगुळे) हिने ५५६ गुण घेऊन प्रथम क्रमांक,कृणाल रामा पंडित [कणकुंबी] याने ५५३ गुण मिळवून द्वितीय तर स्नेहल शाम नाईक( कणकुंबी ) हिने ५३८ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. विशेष श्रेणीत ३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १६ तर द्वितीय श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
हायस्कूलचा निकाल ६० टक्के लागला आहे.सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी, मुख्याध्यापक.एस.जी.चिगुळकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.