
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
इदलहोंड (ता. खानापूर ) येथील कै. डी.के .पाटील यांचा नातु अमर प्रेमानंद पाटील (वय.३५ ) याने बेळगाव पणजी महामार्गावरील इदलहोंड फाट्यावरील आपल्या दुकानात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि.१७ मे रोजी घडली.
घटनेची माहिती पोलिसाना मिळताच पोलिसानी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला.
लागलीच मृतदेह उतरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी दवखान्यात आणण्यात आला.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
त्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुले असा परिवार आहे.
इदलहोंडचे सामाजिक कार्यकर्ते कै.डी.के.पाटील यांचा तो नातू होय.