
#खानापूर ऊस उत्पादकांची धाव हुदलीकडे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सन २०२४-२५ सालाच्या गळीत हंगामाला सुरूवात झाली असुन बेळगाव जिल्हातील काही साखर कारखाण्यानी गळीत हंगामाला सुरूवात केली आहे.
बेळगाव शुगर्स लिमिटेड हुदली गळीत हंगाम ६ नोव्हे. पासुन ते २६ नोव्हेबर पर्यतच्या काळात. २० दिवसात २ लाख २५ हजार टन ऊसाचे गाळप!
बेळगाव शुगर्स लिमिटेड हुदली साखर कारखाण्याचा गळीत हंगाम ६ नोव्हेबर सुरू झाला. २० दिवसात २ लाख २५ हजार टन ऊसाचे गाळप झाले आहे.
अशी माहिती मणतुर्गा (ता.खानापूर ) येथील भाजपचे नेते ऊस वाहतुकदार ट्रक मालक शांताराम पाटील बोलताना सांगीतले की,
खानापूर तालुक्यातुन गेल्या सात,आठ वर्षापासुन स्वत:च्या ट्रकने ऊस वाहतुक करतो. यंदाही गेल्या काही दिवसापासुन मी ऊसाची वाहतुक करत आहे.
खानापूर तालुक्याच्या मणतुर्गा,नेरसा ,अशोकनगर, त्याचबरोबर नागुर्डावाडा , मोदेकोप सह बेकवाड भागातुन दिवसा काठी अनेक ऊसाने भरलेल्या ट्रका हुदली साखर कारखाण्याकडे जात आहेत.
दररोज खानापूर तालुक्यातील ऊस ट्रका हुदली साखर कारखाण्याकडे!
खानापूर तालुक्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील नागुर्डा,मोदेकोप,ओतोळी,काटगाळी आदीसह नेरसे,अशोकनगर ,मणतुर्गा, बेकवाड भागातील ऊस उत्पादक आपला ऊस लवकरात लवकर कसा जाईल व ऊसाच्या व्यापातुन मोकळा होईन याकडे पहात आहेत.
तालुक्यात हत्तीकडुन पिकांचे नुकसान शेतकर्यात भितीचे वातावरण !
तालुक्याच्या मडवाळ भागासह ,शिवठाण ,शिंदोळी आदी भागात ९ हत्तीच्या कळपाने भात पिकाचे नुकसान केले आहे. तेव्हा हा ९ हत्तीचा कळप तालुक्याच्या कोणत्या भागात केव्हा येऊण ऊस पिकाचे नुकसान करील याचा नेम नाही .यासाठी अशोकनगर,नेरसा,मणतुर्गा भागातील शेतकरी हुदली साखर कारखाण्याकडे ऊस पाठविण्याची धडपड करत आहे.
त्यामुळेच हुदली साखर कारखाण्याकडे खानापूर तालुक्यातुन ऊस ट्रका धावताना दिसत आहे.
अलिकडे खानापूर तालुक्यातून ऊस सतीश शुगर्स़ हुदली,संकेश्वर साखर कारखाना,हल्याळ साखर कारखाना, बैलहोंगल साखर कारखाण्याना ऊस वाहतुक होत असल्याची माहिती ऊस वाहतुकदार भाजप नेते शांताराम पाटील यानी बोलताना सांगीतले.