
#सभेला मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे भाजपा युवा मोर्चा ग्रामिण सेक्रेट्ररी पंडित ओगले यांचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
भारतीय सेवा मंच यांच्यावतीने हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन रविवारी दि.२ फेब्रूवारी रोजी सायंकाळी ५ वाजता खानापूर येथील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर आयोजित करण्यात आली आहे.
तेव्हा सर्वानी मोठ्या संख्येने हिंदू धर्म जागृती सभेला उपस्थित राहा. असे आवाहन भाजप युवा मोर्चा ग्रामीण सेक्रेटरी पंडित ओगले यानी मंगळवारी दि .२८ रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बोलताना पंडित ओगले म्हणाले की, या सभेला अवरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरू हे उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुराष्ट्रीय नेते धनंजय देसाई हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सांयकाळी ४.३० वाजता टाळमृदंगाच्या नादात शिवस्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करून आंबेडकर गार्डनमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन तसेच जांबोटीक्राॅसवरील बसवेश्वरच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करून मलप्रभा क्रिंडागणावर हिंदु धर्म जागृती सभेला प्रारंभ होणार आहे.
यावेळी ते म्हणाले की, हिंदू धर्म जागृती सभा आयोजनाचे कारण म्हणजे अलिकडे हिंदूच्यावर होणार अत्याचार,भारतात राहुन पाकिस्तानावर ,बांगला देशावर प्रेम करतात एवढेच नव्हे ज्या लोकाना वंदे मातरम् ,भारत माता की जय म्हणायला लाज वाटते.अशा या लोकाना वटणीवर आणण्यासाठी ही हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन केले आहे.
ही सभा म्हणजे कोणती राजकीय सभा नव्हे.ही सभा केवळ हिंदू धर्मासाठी सभा आहे.यामध्ये सर्व पक्षीय हिंदुनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी तालुक्याचे सर्व आजी माजी प्रतिनिधी,नेते मंडळी ,युवा कार्यकर्त्यानी मोठ्या संखेने उपस्थिती राहणार आहे.
अशी माहिती भाजप युवा मोर्चा ग्रामीण सेक्रेटरी पंडित ओगले यांनी पत्रकाराना दिली.
यावेळी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.