
८ जन गंभीर जखमी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर नंदगड महामार्गावरील हेब्बाळ गावाजवळील वळणावर केए ५० पी ४०२५ क्रमांकाच्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारची रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जोराची धडक बसुन कार पलटली. कार मधील ८ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना.गुरूवार दि.८ रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यानी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थाच्या मदतीने कारमधील गंभीर जखमीना बाहेर काढुन लागलीच रूग्णवाहिकातुन उपचारासाठी बेळगावला पाठविले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अथणी येथील कुलकर्णी कुटूंब देव दर्शन घेऊण खानापूर मार्गे अथणीकडे येत असताना हेब्बाळ ( ता.खानापूर ) गावच्या वळणावर रस्त्याच्या बाजुच्या झाडाला जोराची धडक दिल्याने कारने पलटी घेतली.त्यात गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला.त्यामुळे गाडीतल्या प्रवाशाना गंभीर दुखापत झाली. लागलीच त्याना उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले.
लागलीच नंदगड पोलिसाना आपघाताची माहिती देण्यात आली.घटनास्थळी पोलिसानी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलिस पुढील तपास करत आहेत.