
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हत्तरवाड ( ता.खानापूर) येथील रहिवासी आणि हलशी ( ता.खानापूर ) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक भुंजंग हणमंत गुंजीकर ( वय.७६ ) यांचे रविवारी दि.४ रोजी हृदयविकराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे,दोन मुली,सुना ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.
पुणे येथील उद्योजक प्रमोद गुंजीकर यांचे ते वडील होत.