
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
# आजी,माजी आमदार ,भाजप नेते ,कार्यकर्त्याची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
मणतुर्गा ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र व खानापूर तालुका भाजपचे सचिव गजानन पाटील यांचा गुरूवार दि.२८ रोजी जन्मदिनाचे औचित्य साधुन साधेपनाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त त्याचा शाल ,पुष्पहार व केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की ,गजानन पाटील यांच्या जन्म मणतुर्गा ( ता.खानापूर ) या गावी झाला.
आपल्या मणतुर्गा गावात भाजप पक्षाला बळकट करण्यासाठी त्यानी सिंहाचा वाटा उचलला आहे.
खानापूर तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल यांच्या मार्गादर्शनाखाली कार्यकरत असताना त्यानी खानापूर तालुका भाजप सचीव म्हणून सेवा बजावली आहे.
भाजप पक्षाच्या कार्यासाठी अहोरात्र धडपडणारा कार्यकर्ता म्हणून गजानन पाटील यांच्याकडे पाहिले जाते. असे विचार व्यक्त केले.
आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, खानापूर तालुक्यात भाजपच्या कोणत्या कार्यात सदैव पुढे राहणारा कार्यकर्ता म्हणून त्याना ओळखले जाते.
तालुक्या बरोबर मणतुर्गा गावच्या बससेवे साठी सतत प्रयत्न करून गावच्या विद्यार्थ्याची ,नागरीकाची सोय करण्याची तळळमळ त्याची दांडगी आहे. मणतुर्गा परिसरातील समस्या सोडविण्यास त्याचा नेहमीच पुढाकार असतो. माजी आमदार व डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील यांच्या प्रयत्नाने मणतुर्गा गाावत कृषी पत्तीन सोसायटीची स्थापना करण्यास गजानन पाटील यानी कष्ट घेतले.
गर्लगुंजी जिल्हा पंचायत विभागात भाजपच्या बुथ कमिट्या मजबुत व वाढविण्यात त्यांचा हातखंडा आहे.
समाज सेेवेचे व्रत घेऊन सतत स्वताला कार्यात झोकून घेणारे भाजपचे युवा नेते गजानन पाटील याना आजच्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा त्यानी व्यक्त केल्या.
यावेळी खानापूर तालुका भाजप माजी अध्यक्ष संजय कुबल , माजी जि.प.सदस्य बाबूराव देसाई, माजी ता.प. सदस्य अशोक देसाई, भाजपनेते बाबासाहेब देसाई, राजेद्र रायका, अशोक नेसरीकर, प्रकाश निलजकर,तसेच शेकडो भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.