
# सन १९९५ -९६ दहावीची तुकडी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
हलगा ( ता. खानापूर ) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळच्या वनश्री हायस्कुलच्या सन १९९५-९६ सालच्या दहावीच्या तुकडीचा स्नेहमेळावा
सोमवार दि.१२ मे रोजी दुपारी हॉटेल मधुवन या ठिकाणी संपन्न झाला.
यावेळी प्राथमिक शाळेचे शिक्षक एन के पाटील,त्याचबरोबर वनश्री हायस्कूचे शिक्षक व्ही बी पाटील , टी एल सुतार, सौ .एस एस रोटी , रमेश गुरव ,तुकाराम जांबोटकर, शिपाई हनुमंत पाटील , दशरथ नाळकर उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित गुरुजनांचे मंचकावर विराजमान करण्यासाठी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन केले. ईशस्तवन आणि स्वागत गीत गाऊन माजी विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची सुरूवात झाली.
मंचकावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले . सेवानिवृत्त शिक्षक एन के पाटील,सौ एस एस रोटी , तुकाराम जांबोटकर, रमेश गुरव, टी एल सुतार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . दुपारी स्नेह भोजनानंतर संगीत खुर्ची,उभा खो-खो ,कबड्डी यासारखे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले त्याला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजर होत्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम के पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन व्ही.के पाटील यांनी पार पाडले.