
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#खानापूर पोलिसानी केली सुटका!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अलिकडे गुगल मॅपवर प्रवास करणे जितके सोपे तितकेच त्रासाचे होते.याची प्रचिती उज्जैनहुन गोव्याला जाणार्या डब्लू बी ०६ एच ८५५० क्रमांकाची कार गुगल मॅप लावून जाताना चक्क शिरोलीच्या जंगलात अडकले. राजदास रणजीत दास राहणार बिहार असे वाहन चालकाचे नाव आहे.
याठिकाणी कोणतेही नेटवर्क नसल्याने त्याना अनेक समस्या आल्या. त्यानी खानापूर पोलिसाशी संपर्क साधून आपण जंगलात अडकल्याची कल्पना दिली.
लागलीच खानापूर पोलिसानी आज गुरूवारी सकाळी ७ वाजता शिरोली जंगलात जाऊन उजैनहुन गोव्याला जाणार्या कार चालकाना खानापूर आणले.त्यानंतर त्यांची गोव्याला जाण्याची व्यवस्था केली.
खानापूर पोलिस स्थानकाचे ए एस आय श्री.बडीगेर याच्या प्रयत्नाने त्याचा पुढील प्रवास सुखकर झाला.
तेव्हा गुगल मॅप लावुन प्रवास करणे प्रवाशाना किती त्रासाचे झाले याच हे एक उदाहरण ठरले.