
#दोन उमेदवरात आडीज वर्षाचा काळ वाटून!
#पहिले २.५ वर्षे सुरपूरकेरवाड मुख्याध्यापक महंतेश कित्तूर तर पुढील २.५ वर्षे.चिक्कदिनकोप्प हायस्कूलचे गुपीनाथ बडिगेर याना!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाच्या दि २८ नोव्हेबर रोजी खानापूर तालुका सरकारी नोकर संघाच्या सरकारी हायस्कूल विभागाच्या १ जागेसाठी होणार्या निवडणुकीत उमेदवार सरकारी चिक्कदिनकोप हायस्कूलचे गोपीनाथ बडिगेर व सुरपूर केरवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक महंतेश कित्तूर यांच्या समजोता होऊन निवडणुकीला फाटा देऊन आडीज आडीज वर्षाचा काळ वाटून घेण्याचा निर्णय माजी खानापूर तालुका सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष बी एम यळ्ळूर ,मुख्याध्यापक एस.एस.घोरपड,बी.एम बसर्गी,एम एन उत्तरकर,जे.एन चिकोडी ,पी एस मादार,एस.डी .कुलकर्णी,एम.एन मदनभावी ,पी व्ही पारदी आदी मुख्याध्याच्या मार्गदर्शनाखाली सरकारी हायस्कूल विभाग निवडणुक बीन विरोध्द व्हावी .यासाठी प्रयत्न करण्यात आले.
यावेळी महंतेश कत्तूर व गोपीनाथ बडिगेर या दोन्ही उमेदवारातुन समजोता होऊन पुढील २०२४ ते २९ या पाच वर्षाच्या काळात पहिल्या आडीज वर्षासाठी सुरपूर केरवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक महंतेश कित्तूर याना सदस्य पद तर पुढील आडीज वर्षाच्या काळासाठी चिक्कदिनकोप हायस्कूलचे गोपिनाथ बडिगेर याना सदस्य देण्यात येणार आहे.
त्यामुळे खानापूर तालुका सरकारी नोकर संघाच्या हायस्कूल विभागातुन निवडणुकीला फाटा देऊण शिक्षकाचा वेळ व पैसा बचत करण्यात आला.त्याबदल हायस्कूल विभाग शिक्षकाचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.