
#गर्लगुंजी बसस्थानकापासुन गणपती मंदिरपर्यत स्पीडब्रेकची गरज!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावच्या गर्लगुंजी खानापूर रस्त्यावरील बसस्थानकापासुन गणपती मंदिर पर्यत स्पीड ब्रेक घालण्याची मागणी गर्लगुंजी नागरीकांतुन होत आहे.
गर्लगुंजी गावाला बेळगावहुन खानापूरला जाणार्या रस्त्यावर दिवसेदिवस वाहतुक वाढली आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे शाळकरी मुले रस्ता ओलांडताना धावत्या वाहना ठोकरण्याची शक्यता आहे..या रस्त्यावरून प्राथमिक मराठी मुला – मुलीच्या शाळेची,माऊली गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थीनी तसेच ज्योतिराव फुले हायस्कूलचे विद्यार्थी नेहमीच येजा करत येत असतात.
या रस्त्यावर स्पीड ब्रेक नसल्याने आपघात होण्याचा संभव आहे.
तेव्हा यारस्त्यावर स्पीड ब्रेक घालण्यासाठी गर्लगुंजी ग्राम पंचायतीने संबधीत खात्याला निवेदन देऊन समस्या दुर करावी.अशी मागणी गर्लगुंजी नागरीकातुन होत आहे.