
#२२ वर्षे भारतीय सैन्यात सेवा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने २२ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या व नुकताच निवृत्त झालेल्या माजी सैनिक किरण गणपती लोहार यांचा सत्कार सोहळा सोमवारी दि.१९ रोजी माजी सैनिक स़घटनेच्या कार्यालयात पार पडला.
निवृत्त सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक बाबूराव मेलगे होते.
यावेळी निवृत्त सैनिक किरण गणपती लोहार यांचा माजी सैनिक संघटनेच्यावतीने अध्यक्ष बाबूराव मेलगे व पदाधिकार्याच्याहस्ते शाल ,श्रीफळ मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्ष बाबूराव मेलगे म्हणाले की आपल्या प्रत्येक घरातील एक युवक भारत देशासाठी लष्करात भरती झाला पाहिजे. कारण देश रक्षणासारखे दुसरे पुण्याचे काम कोणतेच नाही. सरकार सैनिकासाठी अनेक सवलती देत आहे.
तेव्हा भारतीय सैनिका सारखी सेवा इतर सेवे पेक्षा श्रेष्ठ आहे. प्रत्येक युवकाने भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगुन परिश्रम घेतले तर नक्कीच भारतीय सैन्यात यशस्वि होता येईल . कारण देश सेवा हीच श्रेष्ठ सेवा म्हणता येईल.
यावेळी ते म्हणाले की आपल्या सीमाभागात युवकाना कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीमुळे इतर खात्यात नोकरी मिळत नाही. एक तर सैन्यात भरती होणे अन्यथा शिक्षक होणे. याशिवाय पर्याय नाही.
तेव्हा आजच्या युवकानी सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्ना करावा.असे आवाहन केले.
यावेळी गर्लगुंजी परिसरातील अनेक माजी सैनिक उपस्थित होते.